अपडेटमहाराष्ट्रराजकारण

सत्ता संघर्षाचा निकाल, विधानसभा अध्यक्षांच्या निकालातील महत्त्वाचे मुद्दे…

Share this post

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालाचे वाचन केले आहे. शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. तसेच शिंदे गटाचे १६ आमदार देखील पात्र ठरवण्यात आले आहेत.

२१ जून २०२१च्या बैठकीचे हजेरी पत्रकाची मुळ प्रत व सादर केलेली प्रत यांमधील तफावत आहे. यामुळे हा पुरावा ग्राह्य धरता येणार नाही. बैठकीला अनुपस्थित राहणे हे अपात्रतेचे कारण ठरू शकत नाही. विधीमंडळ अधिवेशनास अनुपस्थिती हे कारण ठरू शकते, असं नार्वेकरांनी स्पष्ट केलं.

संपर्काच्या बाहेर गेले, केवळ याच कारणास्तव आमदारांना अपात्र ठरविता येणार नाही. शिवाय, ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, रविंद्र फाटक यांनी सुरतेत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली हे ही सिद्ध झाले. मिलिंद नार्वेकर आणि फाटक एकनाथ शिंदेंना सुरतमध्ये भेटले. त्यामुळे आमदारांशी संपर्क होऊ शकला नाही हे मान्य करता येणार नाही.

सत्तांतराच्या काळात खरा पक्ष हा शिंदेंचा हे निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. त्यांच्या निकालाचा मी आधार घेत आहे. त्यामुळे २१ जून २०२२ च्या शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतील गैरहजरीच्या मुद्दयावर अपात्रता ठरविता येणार नाही, असं नार्वेकर म्हणाले.

बैठक घेतेवेळी सुनिल प्रभू हे प्रतोद नव्हते. त्यामुळे त्यांनी बजावलेला व्हीप ग्राह्य धरता येणार नाही. भरत गोगावले यांचा व्हीप मी ग्राह्य धरतोय. कारण भरत गोगावलेंची प्रतोदपदी निवड वैध आहे, असं ते म्हणाले.

विधिमंडळात बहुमत ज्याचे असेल त्याचाच पक्ष असतो. त्यामुळे शिंदे गट हीच खरी शिवसेना असून एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र आहेत. २१ जून २०२२ रोजी विधीमंडळ सचिवालयाकडे असलेल्या नोंदीनुसार शिंदे गटाकडे बहुमत दिसत आहे. त्यामुळे शिंदे गट हा त्या दिवशी खरा शिवसेना पक्ष असल्याचे दिसून येते. एकनाश शिंदेंना हटवण्याचा अधिकार पक्षप्रमुखांना नाही.

शिंदे गटाच्या बाजूने निर्णय देताना राहुल नार्वेकांनी वरील पाच महत्वाचे मुद्दे मांडले. त्यानंतर शिवसेना शिंदेंचीच असा निकाल दिला.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *