राजकारणअपडेटमहाराष्ट्र

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांपुढं ३ डिसेंबरपर्यंत नियमित सुनावणी…

Share this post

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्यापासून सुटीचे दिवस वगळता ३ डिसेंबरपर्यंत दररोज सुनावणी घेणार आहेत. याप्रकरणी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतोद सुनिल प्रभू यांची उलट तपासणी झाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वकील महेश जेठमलानी यांनी त्यांना काही प्रश्न विचारले. या सुनावणीतल्या जबाबाच्या इंग्रजीतल्या नोंदीवर सुनावणी दरम्यान काही वाद झाले. जेठमलानी यांनी विचारलेले काही प्रश्न वेळकाढूपणा करणारे होते असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी या सुनावणीनंतर केला. सुनिल प्रभू यांची उलट तपासणी सुरू राहणार आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *