शिवरे ता.पारोळा येथील २९ जणांना पाण्यातून विषबाधा,महिला,बालकांचा समावेश…
शिवरे (ता.पारोळा) या गावात शेतातील अशुद्ध पाणी पिल्याने दि.९ रोजी दुपारी २९ मजूरांना विषबाधा झाली. सर्व रुग्णांवर पारोळा कॉटेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका रुग्णांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला धुळे वैद्यकीय महाविद्यायल रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. इतर सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
शिवरे गावात मध्यप्रदेशातून शेतमजूरीसाठी आलेले मजूर आणि त्यांच्या परिवारातील बालक अशा २९ जणांनी शेतातील एका ड्रममधील पाणी प्यायल्यानंतर त्यांना अचानक त्रास सुरु झाला. या ड्रममधील अनेक दिवसांपासून साचलेले पाणी प्यायल्याने विषबाधा झाली असावी, असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे.पाणी नमुने तपासणीसाठी आरोग्य सेवकांनी घेतले आहेत.


