अपडेटशैक्षणिक

शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांची बदली

Share this post

राज्याचे शालेय शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्याकडे क्रीडा व युवक सेवा आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच शिक्षण आयुक्त या पदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत त्यांच्याकडे ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काळात राज्याला नवीन शिक्षण आयुक्त मिळतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.

राज्याचे शालेय शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्यां बदलीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. परंतु, याबाबत शासनाकडून कोणतेही अधिकृत आदेश प्राप्त झाले नव्हते. परंतु आता या संदर्भात अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध झाले आहे.राज्याचे स हसचिव प्रशांत साजणीकर यांनी सुरज मांढरे यांना बदली झाल्याचे परिपत्रक काढले आहे. तसेच तात्काळ पदभार स्वीकारण्यासंदर्भात आदेश दिले आहेत.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *