शिक्षक-मुख्याध्यापकांच्या समस्या सोडवणार: मंत्री दिपक केसरकर
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज कोल्हापूर येथे शिक्षक संघाच्या अधिवेशनात बोलतांना शिक्षक-मुख्याध्यापकांच्या समस्या सोडवणार व शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करणार, असे त्यांनी सांगितले.
टप्प्यावरील शाळांना सर्वच शाळांना अनुदान देणार असुन, एकूण ११६० कोटी अनुदान दिले आहे उर्वरित लागणारे अनुदान अनुदान ३० डिसेंबर पर्यंत देणार आहोत. राज्यातील नर्सरी ते ज्युनिअर – सिनिअर केजी पर्यंत सत्तर हजार शाळा जुन पासुन नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे सुरु करणार, माध्यमिक शाळांना शासकीय दर्जा देवून ३५००० शाळेतील मुलांना गणवेश देणार,प्राथमिक शाळांसाठी कला व क्रीडा शिक्षक भरणार, ५ डिसेंबर पासुन स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रम राबवुन स्वच्छ शाळांना बक्षीसे देणार, देशात चांगले वैज्ञानिक घडावे म्हणुन वाचन संस्कृती वाढवणार व मोफत वाचनालये देणार, संच मान्यता डिसेंबर पर्यंत पुर्ण करून जानेवारीत कमी झालेली पदे पुन्हा देणार,मुलांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी मोफत वहया पुस्तके देतो.
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे भरणार, शिक्षकांची पदे पवित्र पोर्टल नुसार तीनास एक असे भरणार या साठी रोस्टर तपासणी करून घ्या शिक्षकांची ३० हजार पदे भरणार आहे.
जुनी पेन्शन योजना लागु करणार आहे पण शिक्षकांना त्यांचे Contributin भरावेच लागेल. महाराष्ट्र हे कल्याणकारी राज्य असुन शैक्षणिक आलेख उंचवण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर आहे, असे ते म्हणाले.
