अपडेटनोकरी/उद्योगमहाराष्ट्रशैक्षणिक

शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यास, आचार संहितेमधून मिळाली सूट

Share this post

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती राबविण्यात येते.

या शिक्षक भरतीसाठी पदवीधर/शिक्षक मतदार संघाच्या प्रक्रियेवर प्रभाव पडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होईल अशी कोणतीही कृती घडणार नाही, याबाबत खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरती प्रक्रिया राबविण्यास मान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता रखडलेली शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी अनेक नवनियुक्त शिक्षकांना कामावर रुजू होता येणार आहे; अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिली आहे.

शिक्षण विभागातर्फे २५ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांच्या नियुक्ती बाबतची कार्यवाही संबंधित व्यवस्थापनांना पूर्ण करता येईल. दरम्यान समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयांप्रमाणे संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कार्यवाही करण्याबाबत शासनाने परवानगी दिली आहे; अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *