शिक्षकांच्या 268 जागांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती
जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांची पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहेत.पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मंत्रालय यांच्या पत्रान्वये पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील व खासगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळेतील निवृत्त शिक्षकातून तद्नंतर निवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२ नुसार पेसा क्षेत्रातील शिफारस पात्र उमेदवारांनमधून तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्त्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देणेबाबत निर्देश प्राप्त झालेले आहे.
या अनुषंगाने जिल्हा परिषद, नंदुरबार मधील पेसा क्षेत्रातील प्राथमिक शिक्षकांची २६८ रिक्त पदे भरण्यासाठी २२ ते २६ जुलै अखेर कार्यालयीन वेळेत आवेदन पत्र शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद, नंदुरबार या कार्यालयात मागविण्यात येत आहे.
पात्र उमेदवारांनी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार यांच्या नावे अर्ज करावे, सदर नियुक्तीसाठी निवृत्त शिक्षकांना कमाल वयोमर्यादा ७० वर्ष राहिल व प्रतीमहिना मानधन २० हजार देय राहील. इच्छुक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील व खासगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळेतील सेवा निवृत्त शिक्षक व शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ नुसार पेसा क्षेत्रातील शिफारस पात्र उमेदवार यांनी निवृत्ती बाबत व इतर कागदपत्रांसह अर्ज सादर करावे.
