शिक्षकांच्या कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करणार – फडणवीसांची पत्रकार परिषदेत माहिती.
मुंबई : शिक्षकांच्या कंत्राटी भरतीवरून राज्यभरात तीव्र पडसाद उमटत होते. अखेर राज्य सरकारने कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत मध्ये दिली.

