शिक्षकांचा स्व-जिल्ह्यात बदलीसाठी मार्ग मोकळा.
स्व-जिल्ह्यात बदलीसाठी नव्याने अर्ज करता येणार.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदलीचा सहावा टप्पा लवकरच राबवण्यात येणार आहे. यामध्ये 2022 मध्ये अर्ज केलेल्या शिक्षकांना अर्जात बदल करण्याची आणि अर्ज न केलेल्या नवीन शिक्षकांना अर्ज करण्याची संधी देण्यात येणार आहे. यासंदर्भाचा शासन आदेश दिनांक 3 नोव्हेंबर रोजी तुषार महाजन उपसचिव यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेला आहे.
अर्ज न केलेल्यांना यामध्ये अर्ज करण्याची संधी देण्यात यावी व अर्ज केले आहेत त्यांना यात बदल करण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली होती ती पूर्ण करण्याचे आश्वासन शिक्षण मंत्री केसरकर यांनी दिले होते. अंतर जिल्हा बदलीच्या सहावा टप्यात ज्यांनी अर्ज केलेले नाही त्यांना नव्याने अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.
