शाळेची सहल घेऊन जाणारी बस उलटली,२ ठार ५५ जखमी…
पुण्यातून शाळेची सहल घेऊन जाणाऱ्या एका बसचा ताम्हिणी घाटात भीषण अपघात झाला आहे. ही बस कोंडेघर गाव हद्दीत उलटली असून यात दोघे ठार झाले आहे तर ५५ जण जखमी झाले आहे. मृतांची नावे समजू शकली नाही. घटनास्थळी पोलिस आणि बचाव पथक रवाना झाले आहे. दरम्यान अपघाताची माहिती समजताच ग्रामस्थांनी तातडीने बचाव कार्य राबवून बसमध्ये अडकले असणाऱ्या नागरिकांना बाहेर काढले. जखमींवर नजीकच्या माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत.
पुण्याकडून माणगावकडे येताना ट्रॅव्हल बस उलटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पुण्याहून हरिहरेश्वरला सहल घेऊन जात असताना या बसचा अपघात झाला. अपघातामुळे काही काळ या मार्गवर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी येथील वाहतूक ही सुरळीत केली आहे.
माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ताम्हिणी घाटात सकाळी सातच्या सुमारास एमएच ०४ एफके ६२९९ ही खासगी ट्रॅव्हल बस पुण्याहून माणगावच्या दिशेने जात होती. या बसमध्ये काही पर्यटक आणि शालेय विद्यार्थी होते. दरम्यान, ही बस कोंडेघर गावाच्या हद्दीत आल्यावर बसचालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. यात दोन महिला ठार झाल्या.
ताम्हिणी घाटात अवघड वळणावर बस चालकाचा नियंत्रण सुटल्याने बस उलटली अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. अपघातात बसमधील अनेक प्रवासी अडकले होते. यावेळी कोंडेघर गाव परिसरातील नागरीक घटनास्थळी येत त्यांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले.
Maharashtra | Two people died and 55 got injured after a travel bus overturned in the Tamhani Ghat area of Raigad under the Mangaon police station area at around 7.30 am today. The injured were taken to the nearest hospital for treatment: SP Raigad, Somnath Gharge pic.twitter.com/zyXvMS4vAf
— ANI (@ANI) December 30, 2023

