शालेय पोषण आहारात अंडी देण्याच्या निर्णयाला, जैन संघटनांचा विरोध…
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळांमधून उक़डलेली अंडी, अंडा पुलाव, अंडा बिर्याणी, शाकाहारी मुलांसाठी केळी असा आहार देण्याचे ठरले आहे. त्याला जैन संघटनांनी विरोध केला आहे.
यासंदर्भात वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य विभाग खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जैन संघटनेने निवेदन दिल्याचे समजते. आहारामध्ये अंड्याचा समावेश केल्यामुळे जैन, वारकरी संप्रदाय, ब्राह्मण, महानुभाव पंथी असे अनेक शाकाहारी विद्यार्थी धर्मभ्रष्ट होतील.
पहिली ते चौथीच्या इयत्तेतील मुले ही निरागस असतात. अशावेळी त्यातील काही मुलांना अंडी देण्यात आली तर सोबतची शाकाहारी मुलेही ती अंडी खाऊ शकतील. त्यातून त्यांना मांसाहाराची सवय लागू शकते.शासनाने विद्यार्थ्यांना अंडे न पुरवता त्यांना ताजी पौष्टिक फळे पुरवावीत असे या संघटनांनी सुचविले आहे.


