व्लादिमीर पुतिन पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष…
व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा बहुमताने निवडणूक जिंकली आहे. तब्बल पाचव्यांदा ते देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडणूक आले आहेत. रशियामध्ये तीन दिवस राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका पार पडला. या निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. पुतिन यांनी त्यांना विरोध करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं होतं. त्यामुळे अत्यंत नियंत्रित वातावरणात हा निवडणूक पार पाडल्याचा दावा केला आहे.
पुतिन यांना 88 टक्के जनतेनं पाठिंबा दिला आहे. याचा वापर ते युक्रेन युद्धासाठी करतील असं अनेकांचं म्हणणं आहे. तर पुतिन यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहावं असं अनेकांचं म्हणणं आहे. तर पुतिन हे सैन्याला बळकट करतील आणि नवीन भरती मोहीम सुरू करतील असंही काहींचं म्हणणं आहे.
विरोधी कार्यकर्ते आणि युद्ध टीकाकारांवरील दडपशाही अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्यांनी ज्यांनी पुतिन यांना विरोध केला किंवा करतात त्यांना पुतिन यांनी आपल्या दडपशाहीने तुरुंगात डांबलं आहे. त्यांच्यावर कारवाई केल्याचं गेल्या काही महिन्यांमध्ये पाहायला मिळालं.
रशिया आणि भारताचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तज्ज्ञांच्या मते पुतिन पाचव्यांदा निवडणून आले आहेत तर त्याचे परिणाम भारतावरही होणार आहे. अमेरिकेला शह देण्यासाठी अजून बळकटी मिळेल. पुतिन यांची धोरणं आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्णयांचा भारतावरही मोठा परिणाम होणार आहे. ते आगामी काळात समजू शकतं.
निवडणुकीतील विजयानंतर पुतिन यांनी स्पष्ट केले की या निकालाने पश्चिमेला संदेश दिला पाहिजे की त्यांच्या नेत्यांनी युद्ध असो वा शांतता, धैर्यवान रशियाशी तडजोड केली पाहिजे. सैन्याला अजून बळकट केलं पाहिजे हे देखील त्यांनी सांगितलं आहे. त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. आतापर्यंत कोणत्याही गोष्टीत अपयश आलं नाही. त्यामुळे भविष्यातही उत्तम यश मिळवण्याकडे वाटचाल करुन असं आश्वासन त्यांनी रशियातील जनतेला दिलं आहे.
