अपडेटराष्ट्रीय

विरोधी पक्षांचे तब्बल ३१ खासदार निलंबित…

Share this post

संसद भवनातील घुसखोरीनंतर लोकसभेच्या कामकाजात सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. लोकसभेतील एकूण ३३ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.

लोकसभेत खासदार बसलेल्या बाकांवर या तरुणांनी उड्या मारून धुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षितेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत सभागृहात सत्ताधारी विरोधकांमध्ये गदारोळ झाला.

या मुद्द्यावरुन लोकसभेत तसेच राज्यसभेत मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. या गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर लोकसभा अध्यक्षांनी मोठी कारवाई करत ३१ जणांना निलंबित केले आहे.

निलंबित केलेल्या खासदारांमध्ये अधीर रंजन चौधरी, अपूर्वा पोद्दार, प्रसून बॅनर्जी, मोहम्मद वसीर, जी सेल्वम, सीएन अन्नादुराई, डॉ टी सुमाथी, के नवस्कानी, के वीरस्वामी, एनके प्रेमचंद्रन, सौगता रॉय, शताब्दी रॉय, आशिथ कुमार मल, कौशलेंद्र कुमार, अँटोनी कुमार यांच्या नावाचा समावेश आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *