विधवा, दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त महिलांसाठी सरकारची योजना, दरमहा पेन्शन मिळणार…
महाराष्ट्र सरकारकडून निराधार महिलांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना राबवण्यात येते. या योजनेद्वारे निराधार महिलांना दरमहा 1500 रुपयांची मदत केली जाते.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून (Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana) विधवा, दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त अशा निराधाप महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 उनदान दिलं जातं.या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तहसिलदार कार्यलयातील सेतू कार्यालयात संपर्क साधू शकता किंवा घरबसल्या ऑनलाईन पद्धतीनेही नोंदणी करु शकता.
विधवा, दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त, अनाथ, परित्यक्ता, देवदासी, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त महिला, तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंबप्रमुखाच्या पत्नीला या योजनेचा लाभ मिळू शकतो.35 वर्षांवरील अविवाहित निराधार स्त्री, इत्यादी दुर्बल निराधार घटक इत्यादी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या योजनेसाठी वयाचा दाखला – किमान 18 ते 65 वर्ष वय, किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.विधवा महिला अर्जदाराकरीता पतीचा मृत्यू दाखला, दिव्यांगांकरता जिल्हा शल्यचिकित्सकांचा दिव्यांगत्वाचा दाखला, अनाथ दाखला ही कागदपत्रे या योजनेसाठी गरजेची आहेत.यासोबतच दुर्धर आजार प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.
या योजनेअंतर्गत तुमचा अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा लाभार्थ्याला दरमहा 1500 रुपये लाभ मिळू शकतो.
