महाराष्ट्रअपडेटशैक्षणिक

विद्यार्थ्यांना ६२ रूपयांत घ्या पाच लाखांचा विमा, राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Share this post

उच्च व तंत्र शिक्षण विभागाने विद्यार्थी वैयक्तिक अपघात विमा आणि वैद्यकीय विमा योजना सुरु केली आहे. या बाबतचा शासन निणर्य १६ ऑक्टोबर २०२३ रोजी जारी करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण सोबत आरोग्य व जीवाचीही काळजी घेतली जाणार आहे.

कोणत्या विद्यार्थ्याना घेता येईल लाभ –विद्यापीठ अथवा संलग्नित महाविद्यालयात पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेणारे विद्यार्थी वैयक्तिक अपघात विमा योजनेसाठी पात्र असतील. प्रथत ते अंतिम वर्षापर्यंतच्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी विमा योजनेसाठी लाभ घेऊ शकतात.

आवश्यक कागदपत्रे –विद्यापीठ अथवा महाविद्यालयात प्रवेश, ओळखपत्र, प्राचार्यांचे अर्जावर स्वाक्षरीसह शिक्का, गुणपत्रिका, जन्मतारीख अथवा बोर्ड प्रमाणपत्र, फोटो.

६२ रूपयांत पाच लाखांचा अपघात विमा –विद्यापीठ अथवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विमा योजना ही ‘एैच्छिक स्वरूपाची’ आहे. यात ६२ रूपयांमध्ये विद्यार्थ्यांना पाच लाख रूपयांचा अपघता विमा काढता येणार आहे.

२० रूपयात एक लाखांचा वैद्यकीय विमा –शासनाने विद्यार्थी वैयक्तिक अपघात विमा योजनेतंर्गत २० रूपयांत एक लाखांचा वैद्यकीय विमा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

विमा कसा काढणार –अपघात विमा आणि वैद्यकीय विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य अथवा कार्यालयीन अधीक्षक, विद्यापीठाचे महाविद्यालयीन विभाग प्रमुखांना भेटून या योजनेचा लाभ घेता येणार आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *