अपडेटमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत : शासन आदेश जारी

Share this post

राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असल्यामुळे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देणे बाबतच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.त्यामुळे येत्या सोमवारपासून दि.२२/४/२०२४ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

राज्यामध्ये काही दिवसांपासून विदर्भ माराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात व कोकणातही तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देणे आवश्यक आहे.त्यामुळे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देण्यात येत आहेत.

राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना उपस्थित राहणेपासून सवलत देण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा.तसेच वरील सूचनांचे पालन होईल याबाबतची दक्षता शिक्षण संचालक (प्राथमिक) व शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी घ्यावी,असे परिपत्रक महाराष्ट्र राज्य शासनाचे उपसचिव तुषार महाजन यांनी काढले आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *