विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकाला मनसे कार्यकर्त्यांकडून चोप…
सांगलीतील एका नामांकित शाळेत सहावीमध्ये शिक्षण घेणार्या अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा प्रकार संबंधित मुलीने आपल्या मैत्रिणीना सांगितला.यावेळी अन्य मुलींनीही असाच प्रकार आपल्याबाबतही झाला असल्याचे सांगितले. ही बाब पालकांना समजताच पालकांनी महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या पदाधिकार्यांशी संपर्क साधून या प्रकरणाची माहिती दिली.
या प्रकरणी पालकांना घेऊन ते संबंधित शिक्षण संस्थेमध्ये पोहचले. अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत झालेल्या प्रकारचा जाब विचारला त्यावेळी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकाला समाधानकारक उत्तरे देता आली नाही त्यानंतर, पीडित पालकांचा व मनसे कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला त्यांनी त्या विकृत शिक्षकाला चांगलाच चोप दिला.
झालेला प्रकार हा अतिशय निंदनिय आहे. पालक आणि विद्यार्थी भीतीच्या वातावरणात आहेत. अशा विकृतीमुळे शाळेत मुली पाठवायला देखील पालक घाबरत आहेत. जोपर्यंत हा विकृत शिक्षक निलंबित होत नाही तोवर आमच्या मुलींना शाळेत पाठवणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतला होता. या वेळी त्या विकृत शिक्षकाला तत्काळ निलंबित करा अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी संस्था चालकांकडे केली आहे.
