अपडेटमहाराष्ट्रशैक्षणिक

विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

Share this post

परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील विजाभज, इमाव व विमात्र प्रवर्गातील गुणवंत विद्याथ्यांकडून परदेशी शिष्यवृत्ती निवडीसाठी सन २०२४-२५ करिता पात्रता तपासण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

विद्यार्थी विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असावा.

विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. ८ लाखपिक्षा जास्त नसावेविद्याच्यनि प्रवेश घेतलेली परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत QS (Quacquarelli Symodes) Ranking २०० च्या आतील असावी.

शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी ३०% जागा मुलींसाठी राखीव असतील.

निवडीसंदर्भातील अन्य अटी व शर्ती या जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार व शासन निर्णय सामाजिक न्याय विभाग दिनांक ३०-१०-२०२३ व शासन निर्णय नियोजन विभाग दिनांक २०-०७-२०२३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे राहतील.

परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्जाचा नमुना, शासन निर्णय, शिष्यवृत्तीसाठी पात्रतेच्या अन्य महत्त्वाच्या अटी शर्ती इ. सविस्तर माहितीसाठी विभागाच्या अधीकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. https://obcbahujankalyan.maharashtra.gov.in

वरील संकेतस्थळा (वेबसाईट) वरून अर्ज डाऊनलोड करून तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रांसह संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे १ यांच्याकडे जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते दिनांक ३०- ०६-२०२४ पर्यंत सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत जमा करावा.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *