महाराष्ट्रअपडेटक्रीडाराष्ट्रीय

वर्ल्ड कपमध्ये भारताचं सेमी फायनलचं तिकिट निश्चित.

Share this post

आज धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर भारताने न्यूझीलंडचा पराभव केला.

भारताने सलग पाचवा विजय मिळवला आहे. भारताने न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव केला. विजयाचे हिरो मोहम्मद शमी आणि  विराट कोहली ठरले, विराटने ९५ धावांची उत्कृष्ट खेळी केली. तर त्यापूर्वी शमीने ५ विकेट घेतल्या. रोहित शर्माने ४६ आणि रवींद्र जडेजाने नाबाद ३९ धावा केल्या. श्रेयसने ३३, राहुलने २७ आणि गिलने २६ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने दोन बळी घेतले. त्याचवेळी बोल्ट-हेन्री आणि सँटनर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

या विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. आता भारताचे १० गुण झाले आहेत.भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २७३ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ६ गडी गमावून लक्ष्य गाठले.भारताच्या या विजयानंतर किवी संघाचा विजय रथ थांबला आहे.

यानंतर आता भारतीय संघाचा पुढील सामना २९ ऑक्टोबरला इंग्लंडशी होणार आहे. हा सामना लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *