अपडेटनाशिकशैक्षणिक

वर्गात चक्कर येऊन बाकावरुन खाली पडली, सहावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू

Share this post

नाशिक सिडको परिसरातील एका शाळेत सहाव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू झाल्याने शाळेत एकच खळबळ उडाली. शाळेत गेल्यानंतर ती चक्कर येऊन बाकावरुन खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला आहे.

दिव्या प्रितेश त्रिपाठी (वय ११, राजलक्ष्मी अपार्टमेंट जगताप नगर उंटवाडी) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. शाळेमध्ये आल्यानंतर ती वर्गात बसलेली होती. मात्र अचानक दिव्याला चक्कर आली आणि ती बेशुद्ध पडली. शाळेतील शिक्षकांनी तात्काळ तिला उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. ही दुर्दैवी घटना सिडकोतील उपेंद्रनगर येथील रुद्र द प्रॅक्टिकल स्कूलमध्ये घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, २५ जून रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे दिव्या त्रिपाठी ही विद्यार्थिनी स्कूल व्हॅनमधून शाळेमध्ये आली. शाळेत तिच्या वर्गामध्ये येऊन बेंचवर बसलेली असताना अचानक तिला चक्कर आली आणि ती बाकावरुन खाली पडली. ती बेशुद्ध पडली झाली होती. दिव्याला पडलेलं पाहून आजूबाजूच्या विद्यार्थ्यांनी आरडाओरड केली. तेव्हा शिक्षकांनी दिव्याचे वडील रितेश वाल्मीक त्रिपाठी यांच्याशी संपर्क केला.

त्यानंतर पुढील उपचारासाठी दिव्याला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉ. गोटे यांनी तपासून दिव्याला मृत घोषित केले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *