लोकसभा निवडणुकांमुळे UPSC परीक्षा लांबणीवर…
केंद्रीय निवडणुक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्याचा परिमाण विविध परीक्षांवर होताना दिसत आहे. त्यातच आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा प्राथमिक (CSE) परीक्षाच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. येत्या २६ मे रोजी होणारी परीक्षा आता सुधारित तारखेनुसार येत्या १६ जुनला होणार आहे.
परिक्षाची अर्ज प्रक्रिया १४ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान पार पडली. या परीक्षेत सहभागी होण्यासाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना परीक्षेच्या काही दिवस आधी प्राथमिक परीक्षेत बसण्यासाठी प्रवेशपत्र दिले जातील. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन सांगितलेला आवश्यक तपशील वापरून उमेदवार केवळ ऑनलाइन मोडद्वारे प्रवेशपत्र लाउनलोड करु शकतील. उमेदवारांची प्रवेशपत्रे इतर कोणत्याही कोणत्याही माध्यमातून पाठवली जाणार नाहीत, असे आयोगाने सांगितले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत एकूण १ हजार २०६ रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यातील १ हजार ५६ पदे भारतीय प्रशासकीय सेवा/IAS (नागरी सेवा) साठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत. उर्वरित १५० पदे भारतीय वन सेवेसाठी (IFS) साठी राखीव ठेवण्यात आली आहेत. परीक्षेच्या संबंधित माहितीसाठी उमेदवार अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन सविस्तर माहिती मिळवू शकतात, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
