अपडेटराजकारणराष्ट्रीय

लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपतींच्याहस्ते भारतरत्न प्रदान…

Share this post

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी ३१ मार्च रोजी आज देशाचा सर्वाच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रोपती मूर्म यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांन सन्मानित केले. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते.

राष्ट्रपतींनी ३० मार्च रोजी राष्ट्रपती भवनात ४ व्यक्तिमत्त्वांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान केले. यामध्ये माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि कृषी शास्त्रज्ञ डॉ. एमएस स्वामीनाथन यांचा समावेश आहे. राष्ट्रपती भवनात चारही व्यक्तींच्या कुटुंबीयांना हा सन्मान मिळाला. नरसिंह राव यांचे पुत्र पीव्ही प्रभाकर राव, चौधरी चरण सिंह यांचे नातू जयंत चौधरी, कर्पूरी ठाकूर यांचा मुलगा रामनाथ ठाकूर आणि एमएस स्वामीनाथन यांची कन्या नित्या राव यांनी राष्ट्रपतींकडून हा सन्मान स्वीकारला.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *