अपडेटउत्तर महाराष्ट्रकोकणपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

रेशन दुकानावर मिळणार मोफत साडी : राज्य सरकरचा निर्णय…

Share this post

राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मोफत साडी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील जवळपास 24 लाख 58 हजार अंत्योदय कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळणार असून याबाबत सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने शुक्रवारी निर्णय जारी केला.

वस्त्रोद्योग विभागाने 2 जून 2023 रोजी एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागातर्फे यंत्रमागावर विणलेली प्रति कुटुंब एक साडीचे मोफत वाटप करण्याची योजना आखली आहे. ही योजनेचा कालावधी 2023 ते 2028 या पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आलेला आहे. त्यानुसार पात्र कुटुंबांना पुढील पाच वर्षे प्रत्येक वर्षी एक या प्रमाणे साडीचे मोफत वाटप केले जाणार आहे.

सदर योजना राज्य यंत्रमाग महामंडळ राबविणार असून 2023-24 या वर्षासाठी महामंडळ एक साडी 355 रुपयांना खरेदी करणार आहे. या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, वाहतूक, जाहिरात, प्रसिद्धी, साठवणूक, हमाली यासाठी येणारा खर्च महामंडळाला राज्य सरकारकडून देण्यात येणारं आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *