रेल्वे आरक्षित तिकीट असल्यावर, आपल्या सीटवर कोणी जबरदस्ती बसलं तर काय करायच ?
आपले रिझर्वेशन असताना देखील भलतेच कोणी आपल्या जागेवर येऊन बसतात. वारंवार सांगूनही ते उठायला तयार नसतात. त्यात लांबचा प्रवास असला व बसायला जागा मिळाली नाही तर खूप त्रास सहन करावा लागतो.
पण अशावेळी नक्की काय करायचं? हे आपल्याला माहिती नसते. अशावेळी हा प्रश्न समोरच्याशी कोणतेही भांडण न करता कसा मिटवायचा जाणून घेऊया.

१) प्रथम तुम्हाला रेल्वेकडे तक्रार करावी लागेल. सीटच्या समस्येबद्दल तक्रार करण्यासाठी तुमच्या मोबाइल फोनमध्ये Rail Madad नावाचे अॅपप्लिकेशन डाउनलोड करा.
२) तुमचा मोबाईल नंबर टाकून खाते तयार करता येईल.
३) त्यानंतर तुमच्या कन्फर्म तिकिटाचा पीएनआर क्रमांक टाकावा लागेल. या अॅप्लिकेशनमध्ये तुमच्यासमोर तक्रारीचा पर्याय दिसेल.
४) ज्यावर क्लिक करून तुम्ही घटनेची माहिती तसेच तक्रारीचा प्रकार निवडा.घटनेबद्दल तपशीलवार माहिती भारतीय रेल्वेला पाठवू शकता.
तसेच दुसरा उत्तम पर्याय म्हणजे कोचमध्ये उपस्थित असलेल्या TTE शी संपर्क करा.


