अपडेटदुःखद घटनादुर्घटना

रिल बनवताना थेट ३०० फूट खोल दरीत कोसळून दुर्देवी मृत्यू

Share this post

रिल्स बनवून लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्यासाठी तरुण नको त्या थराला जाऊन स्टंटबाजी करतात, त्याने ते स्वतःचाच जीव धोक्यात घालत असतात. काही दिवसांपूर्वीच हा विषय चर्चेत आला होता व अशी स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांना शिक्षाही देण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा एकदा एका फेमस इन्स्टा इन्फ्लुएंसरने (Insta Influencer) उंच कड्यावरुन रील बनवण्याचा प्रयत्न केला. तिचा तोल गेला आणि थेट ३०० फूट खोल दरीत कोसळून तिचा दुर्देवी मृत्यू झाला. अन्वी कामदार (Aanvi Kamdar) असं या तरुणीचं नाव आहे.

अलिबाग जवळील माणगाव तालुक्यातील कुंभे येथे ही घटना घडली. अन्वी तिच्या काही सहकाऱ्यांसोबत मुंबईहून माणगावमधील कुंभे येथे पर्यटनासाठी आली होती. मात्र दरीच्या एका कड्यावर रिल बनवत असताना अन्वीचा तोल गेला आणि ती तब्बल ३०० फूट दरीत कोसळली. अन्वी २७ वर्षांची होती.

घटनेनंतर अन्वी सोबतच्या सहकाऱ्यांनी ही माहिती तात्काळ माणगाव पोलिसांना दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि स्थानिक बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र दरी अतिशय खोल असल्याने बचावकार्यात अनेक अडचणी येत होत्या. बचाव कार्यास मदत करण्यासाठी पोलिसांनी कोलाड तसेच माणगाव आणि महाड येथून प्रशिक्षक बचाव पथकास बोलावले. सर्वांच्या सहकार्याने अन्वीला जखमी अवस्थेत स्ट्रेचरच्या साहाय्याने वर आणण्यात आले. त्यानंतर अन्वीला माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येणार होते मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला.

दरीत पडून दुर्देवी मृत्यू झालेली अन्वी मुंबई येथे वास्तव्यास होती. अन्वी एक लोकप्रिय सोशल मीडिया रिल स्टार होती शिवाय ती व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असल्याचीही माहिती समोर येत आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *