अपडेटराष्ट्रीय

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह यांची जयपूरमध्ये भरदिवसा गोळ्या घालून हत्या…

Share this post

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये राष्ट्रीय राजपूत करणी सेनाचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

हल्लेखोरांनी गोगामेडी यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने मानसरोवर येथील तातडीने मेट्रो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराच्या आधीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारास सुखदेव सिंह गोगामेडी श्यामा नगर जनपथ येथील निवासस्थानाबाहेर उभे होते. तेव्हा दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

पोलिस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत अन्य दोघे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळतात पोलिस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी सर्व प्रमुख मार्गावर नाकाबंदी केली. तसेच सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्यास सुरुवात केली आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *