रात्री १० नंतर फटाके फोडू नका मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश…
दिवाळीमध्ये फटाके फोडण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाची वेळेची मर्यादा.
दिवाळीमध्ये फटाके फोडण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने वेळेची मर्यादा घालून दिली आहे. वेळेचे हे बंधन आणि ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे, रात्री १० नंतर मुंबईच्या गल्लीबोळांत गस्त वाढविण्याच्या सूचना सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत.
उच्च न्यायालयाने मुंबईतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी फटाके फोडण्यावर रात्री ८ ते १० असे वेळेचे बंधन घातले आहे. रात्री उशिरा फटाके फोडू नयेत. तसेच ध्वनिप्रदूषण करणारे फटाके फोडू नयेत, असे आवाहन करताना न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
