राज्य सरकारचा मागास आणि आर्थिक दृष्ट्या प्रबल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय
मागास आणि आर्थिक दृष्ट्या प्रबल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार ईबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि ओबीसी या वर्गात पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील प्रवेशाचे शैक्षणिक शुल्क आता माफ करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून शिक्षण संस्थांनी देखील कोणत्याही प्रकारची फी घेऊ नये; असे देखील आदेश देण्यात आले आहेत. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून या संदर्भात एक परिपत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे.
सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आता यावर्षी शैक्षणिक वर्षांमध्ये अती मागासवर्ग प्रवर्ग, आर्थिक दुर्बल घटक सामाजिक आणि आर्थिक मागास घटक आणि ओबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. कारण त्यांना कोणत्याही प्रकारची शैक्षणिक फी भरावी लागणार नाही.
उच्च आणि तंत्रशिक्षण विभागांतर्गत मान्यताप्राप्त व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. शिक्षण संस्थांनी प्रवेश घेताना जर या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले, तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई देखील करण्यात येईल; असे देखील सांगण्यात आले आहे.
