राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ…
1 जुलै 2023 पासून महागाई भत्ता 42% वरून 46% होणार.
महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी महागाई भत्त्यात वाढ करण्याचा शासन निर्णय पारित केला आहे. यात सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात 42% वरून 46% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
सदर महागाई भत्ताची वाढ दिनांक 1 जुलै 2023 पासून लागू करण्यात येणार आहे.1 जुलै 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीतील थकबाकी माहे नोव्हेंबरच्या वेतनासोबत रोखीने देण्याबाबतचा उल्लेख शासन निर्णयात आहे.
