महाराष्ट्रइतरउत्तर महाराष्ट्रकोकणपश्चिम महाराष्ट्रमराठवाडाविदर्भ

राज्यातल्या विविध जाती-धर्मातल्या नागरिकांचं मागासलेपण तपासणार – राज्य मागासवर्ग आयोगाचा निर्णय.

Share this post

राज्यातल्या विविध जाती-धर्मातल्या नागरिकांचं मागासलेपण तपासण्याचा निर्णय राज्य मागासवर्ग आयोगानं घेतला आहे.

आयोगाच्या आज पुण्यात झालेल्या बैठकीत नागरिकांचं सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण तपासण्याचा निर्णय झाला अशी माहिती आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी दिली.

यासाठी प्रश्नावली तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. यात सामाजिक मागासलेपणाला सर्वाधिक प्राधान्य दिलं जाणार असल्याचं ते म्हणाले. लवकरच राज्यभरात हे काम सुरू होण्याची शक्यता असून १ लाख कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण केलं जाण्याची शक्यता आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *