रयत शिक्षण संस्थेमध्ये तब्बल 1308 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु
रयत शिक्षण संस्था अंतर्गत भरती निघालेली आहे. ही भरती प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि व्याख्याता या पदांसाठी आहे. या पदांच्या एकूण 1308 रिक्त जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावे लागतील. त्याचप्रमाणे 27 आणि 30 जून या दरम्यान तुम्ही अर्ज करू शकता.
पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि व्याख्यातापदसंख्या – 1308 जागा
नोकरी ठिकाण – सातारा
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 आणि 30 जून 2024
अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. http://rayatshikshan.edu/
