रयत शिक्षण संस्था अंतर्गत मुख्याध्यापक, शिक्षक पदावर मोठी भरती
रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून केशवराव पवार इंग्लिश मीडियम स्कूल, कराड येथे मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 05 जून 2024 निश्चित करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा , अधिकृत वेबसाईट – http://rayatshikshan.edu
