अपडेटदुर्घटना

मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्रा यांच्याकडून पत्नीने मारहाण कानाचा पडदा फाटला, गुन्हा दाखल…

Share this post

लोकप्रिय मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्रा याच्या विरोधात सेक्टर 126 मध्ये पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेच्या भावाने एफआयआर दाखल केली आहे. विवेक बिंद्रा याच्याकडून पत्नीला मारहाण झाल्यानंतर अनेक दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एवढंच नव्हे तर पत्नीच्या कानाचा पडदा देखील फाटला आहे. विवेक बिंद्रा याच्या विरोधात 14 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र शुक्रवारी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिंद्राची पत्नी यानिकाचा भाऊ वैभव क्वात्रा यांनी तक्रार दाखल केली होती, ज्याने दावा केला होता की, ही घटना ते राहत असलेल्या नोएडा येथील सेक्टर 94 मधील सुपरनोव्हा वेस्ट रेसिडेन्सी येथे घडली. 7 डिसेंबरला सकाळी बिंद्रा आणि त्याची आई प्रभा यांच्यात जोरदार वाद झाला. यानिका मध्यस्थी करण्यासाठी पुढे आली असता बिंद्राने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे यानिकाला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

विवेक बिंद्राचा पत्नीसोबत झालेल्या भांडणाचा व्हिडिओही समोर आला आहे. यानिकाला एवढी मारहाण करण्यात आली की तिच्या कानाचा पडदाही फाटला, असा आरोप आहे. पोलीस सर्व बाबी लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास करत आहेत. बिंद्रा बडा बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड (BBPL) चे सीईओ आहेत आणि त्यांना यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर लाखो लोक फॉलो करतात.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *