अपडेटपुणेशैक्षणिक

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात,शासकीयसह खासगी शाळांचाही समावेश…

Share this post

राज्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान राबविले जात असून पुणे जिल्ह्यातही १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालाधीत हे अभियान राबविले जाणार आहे.

शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी आणि त्यातून स्पर्धात्मक वातावरण तयार होऊन विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे, यासाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांना १ लाखांपासून ते ५१ लाख रुपयांपर्यंत बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यात तालुकास्तरावरील स्पर्धेत शासकीय व जिल्हा परिषदेच्या शाळांना प्रथम क्रमांकासाठी ३ लाख, द्वितीयसाठी २ लाख, तर तृतीयसाठी १ लाख रुपये पारितोषिक दिले जाईल.

जिल्हास्तरावर प्रथम बक्षीस ११ लाख, द्वितीय ५ लाख, तृतीय ३ लाख, विभागस्तरावर प्रथम २१ लाख, द्वितीय ११ लाख आणि तृतीयसाठी ७ लाख रुपये, तर राज्य पातळीवर प्रथम ५१ लाख, द्वितीय २१ लाख आणि तृतीयसाठी ११ लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. खासगी व्यवस्थापनाच्या शाळांनाही एवढेच बक्षीस दिले जाणार आहे.त्यामुळे खासगी शाळांनी सुध्दा यात सहभागी व्हावे,असेही आवाहन जि.प.प्राथ.शिक्षणाधिकारी पुणे यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन, अध्यापन व प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे, शिक्षणासाठी पर्यावरणपूरक व आनंददायी वातावरणाची निर्मिती करणे, शाळेचे शिक्षक, माजी विद्यार्थी व पालक याच्यात शाळेविषयी कृतज्ञतेची व उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे हे अभियानाचे उदिष्ट आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *