मुंबई व कोकण पदवीधर,नाशिक व मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुका जाहीर, १० जूनला मतदान…
राज्य निवडणुक आयोगाकडून नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी येत्या १० जून रोजी मतदान घेण्यात येणार असून येत्या १३ जूनला मतमोजणी पार पडणार आहे.
या दोन्ही जागांसाठी १५ मे रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रकिया सुरू होणार आहे. तर २२ मे हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर २४ मे रोजी अर्जांची छाणणी केली जाणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २७ मे आहे. तर प्रत्यक्ष मतदान हे १० मे रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ दरम्यान मतदान होणार आहे, अशी माहिती निवडणुक आयोगाने दिली आहे.
७ जुलै २०२४ रोजी नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार दराडे भिकाजी तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपील पाटील यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे या दोन जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. नाशिक विभागात नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे. या पाच जिल्ह्यात मिळून एकूण ६४ हजार ८०८ शिक्षक मतदार आहेत.
विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन वसंत डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ), किशोर भिकाजी दराडे (नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ) आणि कपिल हरिश्चंद्र पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ) हे ७ जुलै रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे आयोगाने दोन शिक्षक मतदारसंघ आणि दोन पदवीधर मतदारसंघांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
