मुंबई ते धुळे दरम्यान प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेली रेल्वे सेवा नियमितपणे सुरू करण्याचा निर्णय…
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते धुळे दरम्यान प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेली रेल्वे सेवा नियमितपणे सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
धुळे रेल्वे स्थानकावरून आज सकाळी ६ वाजता या नव्या रेल्वे सेवेची खासदार डॉ सुभास भामरे यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरूवात केली. या सेवेचा लाभ नाशिक, जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील प्रवाशांना होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- धुळे एक्स्प्रेस ही गाडी ‘सीएसएमटीहून रोज सकाळी १२ वाजता सुटेल.
