शैक्षणिकअपडेटमहाराष्ट्र

मुंबईतील सरकारी शाळेत, एका विद्यार्थ्यांवर १ लाख २ हजार रुपये खर्च…

Share this post

राज्यामध्ये फक्त 15 दिवसांच्या सर्वेक्षणात 3 हजार 114 मुल शाळाबाह्य आढळली आहेत. त्यात फक्त एकट्या मुंबई शहरात 15 दिवसांमध्ये 365 मुले शाळाबाह्य आढळली आहेत.

या विषयावरुन हिवाळी अधिवेशनात जोरदार चर्चा झाली. मुंबई महापालिका  प्रती विद्यार्थ्यामागे 1 लाख, 2 हजार रुपये खर्च करते. तरीही शाळाबाह्य मुले का ? असा प्रश्न विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित केला. 15 दिवसाच्या सर्वेक्षणात 3 हजारांवर मुले शाळाबाह्य आढळली आहेत. संपूर्ण राज्यात नीट सर्वेक्षण केले तर किती निघतील ? असा सवालही त्यांनी केला.

यावर भाजप नेते व मुंबई शहर अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी चौकशीची मागणी केली. त्यावर शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी चौकशीचे आश्वासन दिले. 

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी फक्त 3 हजार मुले शाळाबाह्य म्हणणे चुकीचे आहे. त्याचे फेरसर्व्हेक्षण करणार आहे काय ? असा सवाल केला. त्यावर 17 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले असता राज्यात 1 हजार 624 मुले व 1 हजार 590 मुले अशी एकूण 3 हजार 214 मुले शाळाबाह्य आढळल्याचे लेखी उत्तर मंत्री केसरकर यांनी सभागृहात साद केले. त्यावर बऱ्याच सदस्यांनी आक्षेप घेतले.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *