अपडेटराजकारणराष्ट्रीय

मिझोरममध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवणाऱ्या झेडपीएमचा विजय…

Share this post

मिझोरममधील विधानसभेच्या ४० जागांपैकी २७ जागांवर पहिल्यांदा निवडणूक लढवणाऱ्या झेडपीएमनं विजय मिळवला आहे.

सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटला केवळ १० जागांवर आघाडी मिळाली असून त्यापैकी ७ जागांवर विजय मिळाला आहे. भाजपला २ जागा मिळाल्या तर काँग्रेसला केवळ १ जागा मिळाली आहे.

मिझोरममध्ये विधानसभेच्या एकूण ४० जागा असून बहुमताचा आकडा २१ इतका आहे.

मिझोरममध्ये मतदारांनी सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटला विरोध पक्षात बसवलं असून पहिल्यांदा निवडणूक लढवणाऱ्या झोरम पिपल मुव्हमेंटला २७ जांगावर विजयी केलं आहे. या राज्यामध्ये भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांना फारसं यश मिळवता आलेलं नाही.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *