मायग्रेनचं दुखणं या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळं…
शरीरात जीवनसत्वाची कमतरता असल्यास अनेक आजारांचा व समस्यांचा सामना करावा लागतो.
नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) च्या रिपोर्टनुसार, मायग्रेनचा त्रास हा शरीरात व्हिटॅमिन बी1, बी2, बी3, बी5, बी6 आणि व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळं होतो. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळं रुग्णांना आठवड्यातील 4 ते 5 वेळा ही समस्या निर्माण होऊ शकते. एका तपासणीत व्हिटॅमिन बी आणि डीच्या कमतरतेमुळं 40 ते 50 टक्के लोक मायग्रेनचा सामना करत आहेत.
मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी व्हिटॅमिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.ब्लूबेरी,संत्री,सफरचंद,कीवी,केळं,चीज,ब्रोकोली,पालक,मशरूम,भुईमुगाच्या शेंगा,रताळे,कोबी,पनीर,दही,सुकामेवा.सकाळच्या कोवळ्या उन्हात बसून शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करा. तुमच्या आहारातही व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ सामील करा. यामुळं हाडं आणि मांसपेशीयादेखील मजबूत होतात.
मायग्रेनचा त्रास व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे तर होतोच पण त्याचबरोबर अति प्रमाणात ताण-तणाव, अतिविचार करणे यामुळं देखील मायग्रेनचा व डोकेदुखीचा त्रास जाणवतो.योग्य आहार, योग्य उपचार आणि आरामामुळं मायग्रेनची समस्या पूर्णपणे बरी होऊ शकते. त्यामुळं आत्ताच आहारात बदल करुन तुम्ही मायग्रेनवर मात करु शकता.
जर त्रास कमी होत नसेल तर तज्ञांचा सल्ला घ्या.
