माणसाला अंतराळात घेऊन जाणारे गगनयान मिशन.
श्रीहरिकोटा : भारतीय संस्थेकडून गगनयान मिशनच्या ‘ चालकदल सुटका यंत्रणे ’ची चाचणी शनिवारी करण्यात आली. या मिशनला ‘ टेस्ट व्हिहिकल अबॉर्ट मिशन-१’ (टीव्ही-डी१) असे नाव देण्यात आले होते. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी त्याचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
आजच्या यशाच्या आधारावरच पहिले गगनयान मिशन सुरू होईल. माणसाला अंतराळात घेऊन जाणारे गगनयान मिशन तीन दिवसांचे असणार आहे. गगनयान मिशनद्वारे अंतराळवीरांना पृथ्वीच्या सर्वाधिक खालच्या म्हणजेच ४०० किलोमीटर अंतरावरील कक्षेत पाठवून पुन्हा सुरक्षित पृथ्वीवर आणण्यात येणार आहे.
श्री.एस.सोमनाथ, अध्यक्ष, इस्रो यांनी घेतलेली चाचणी नियोजित प्रक्षेपण कालावधीतच पूर्ण झाली. चाचणीचा प्रत्येक टप्पा यशस्वी झाला. चालकदल सुटका यंत्रणेने क्रू मोड्यूलला दूर नेणे, क्रू मोड्यूलचे सर्व संचालन व्यवस्थित होणे, चालकदल सुटका यंत्रणा वेगळी होणे, सर्व पॅराशूट उघडणे आणि समुद्रात उतरणे या सर्व प्रक्रिया अपेक्षेप्रमाणे पार पडल्या, यामुळे इस्रोला या चाचणीत यश मिळाले आहे.

