माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम खात्यावर कधी जमा होणार ?
राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न असलेल्या 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. त्यामुळेच आतापर्यंत या योजनेसाठी लाखोंच्या वर अर्ज जमा झाले आहे.
महत्वाचे म्हणजे, हा अर्ज भरल्यानंतर योजनेचे पैसे कधी जमा होणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे.
एक जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे अजूनही या योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु, आतापर्यंत ज्या महिलांनी योजनेसाठी अर्ज भरले आहेत त्यावरच 16 जुलैला तात्पुरत्या पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच १ ऑगस्ट रोजी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी जाहीर होईल. त्यानंतर येत्या 14 ऑगस्टपासून लाभार्थी महिलांच्या खात्यावर योजनेचे रक्कम जमा करण्यास सुरूवात होईल. म्हणजेच 15 ऑगस्ट पर्यंत राज्याचे सर्व महिलांना योजनेची रक्कम मिळालेली असेल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
परंतु जर एखाद्या महिलेने योग्य कागदपत्रे जोडलेले नसतील, किंवा योजनेच्या अर्जामध्ये चुकीची माहिती भरलेली असेल तर त्या महिलेच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे या योजनेचा अर्ज भरताना महिलांनी योग्य माहिती आणि योग्य कागदपत्रांची पूर्तता करावी.
