माझी लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे ? जाणून घ्या.
राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहेत. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहे.
राज्य सरकारच्या या योजनेचा लाभ 21 ते 60 वयोगटातील विवाहित,विधवा, घटस्फोटीत आणि निराधार महिलांना मिळणार आहे.
पात्रता…
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे गरजेचे आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला विवाहित,विधवा, घटस्फोटीत किंवा निराधार असली तरच तिला लाभ मिळणार आहे.
21 ते 60 वर्षे होईपर्यंत या योजनेसाठी महिला अर्ज करू शकतात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडे बँक खाते असणे गरजेचे आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
अर्ज कसा कुठे करणार…
पात्र असलेल्या महिला या योजनेचा अर्ज पोर्टल, मोबाईल ॲप, सेतू सुविधा केंद्रावर जाऊन करू शकतात.पात्र असलेली महिला ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकते.ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र बाल विकास प्रकल्प ग्रामपंचायत वार्ड इत्यादी मधून अर्ज करता येईल.
