अपडेटनागपूरविदर्भ

माजी मंत्री, आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द…

Share this post

राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर सुनील केदार यांना दुसरा धक्का बसला आहे. सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. १५० कोटींच्या घोटाळा प्रकरणात न्यायालयाने त्यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर आता नियमानुसार त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे.

नागपूर जिल्हा बँकघोटाळ्याचा शुक्रवारी २२ डिसेंबर रोजी निकाल लागला. या प्रकरणात कोर्टाने राज्याचे माजी मंत्री आणि कॉंग्रेसचे विद्यमान आमदार सुनील केदार यांना ५ वर्षांच्या कारावासाची आणि १२.५० लाख रुपये रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

२००२ साली नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १५६ कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघड झालं होतं. या प्रकरणाचा आता तब्बल २२ वर्षांनी निकाल लागला. ज्यामध्ये जिल्हा बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आले होते. सुनील केदार यांच्यासह ६ जणांना न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे, तर ३ जणांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

सुनील केदार यांना २ वर्षांपेक्षा अधिक काळाची शिक्षा सुनावल्याने नियमानुसार त्यांची आमदारकी रद्द होणार असल्याची चर्चा होती. याबाबत पोलिसांनी कोर्टाचे आदेश विधीमंडळास पाठवले होते. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अखेर निर्णय घेतला असून सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *