अपडेटशैक्षणिक

मागासवर्गीय विद्यार्थांना महाविद्यालयात शिक्षणाबरोबर पैसे कमावण्याची संधी…

Share this post

शिक्षण घेण्यासाठी गरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीचा सामना कराव लागतो. त्यामुळे अनेकांचे शिक्षण अपुर्ण राहिलेल्याने त्यांचे स्वप्न भंगले जाते. या गोष्टीची SEDG ने गंभीर दक्षता घेतली आहे. दरम्यान, या गरीब व मागासर्गीय होतकरु विद्यार्थ्यांना आता शिक्षण घेतानाच रोजगार मिळावा यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) तज्ञ समितीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० अंतर्गत मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहे. याद्वारे विद्यार्थांना कमवा शिका योजनेअंतर्गत सक्षम केले जाणार आहे. यामुळे त्यांना शिक्षणासोबत पैसे कमवण्याची संधी देखील मिळणार आहे.

SEDG श्रेणीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या, हक्क समजून घेऊन पुढे जाण्यासाठी हा सेल मदत करणार आहे. सर्व शिक्षकांना सेल आणि त्याच्या कामाची माहिती करून दिली जाईल, जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत मदत करता येईल. या विषयीचे मार्गदर्शक तत्त्वे UGC सचिव प्राध्यापक मनीष जोशी यांनी राज्ये आणि विद्यापीठांना पाठवली आहेत. प्रवेश घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या भाषेसंबंधीच्या अडचणी विशेषत: इंग्रजी आणि इतर विषयांच्या ब्रिज कोर्सच्या माध्यमातून दूर केले जाणार आहेत. हे कोर्स स्थानिक भाषेत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्याची क्षमता आणि आवड यानुसार नोकरी किंवा स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी अभ्यासक्रमाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये ऑनलाइन अभ्यासक्रमांचाही समावेश असावा, असे UGC ने आपल्या पत्रात म्हटले आहे. CEDG अंतर्गत महाविद्यालये स्वतःची मार्गदर्शक तत्त्वे देखील तयार करू शकतात, असे ही UGC ने म्हटले आहे. ही योजना प्रामुख्याने लक्षद्वीप, अंदमान-निकोबार बेटे, सीमावर्ती भाग, ईशान्येकडील, ग्रामीण आणि दुर्गम गावे आणि शहरे, आदिवासी क्षेत्रे, महत्त्वाकांक्षी जिल्हे, भूकंप आणि पूरग्रस्त भागांत देखील लक्ष केंद्रित करणार आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *