महिला मदतनीस आणि शिक्षिकेची छेड काढल्या प्रकरणी मुख्याधापकाची धुलाई
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोची येथील जिल्हा परिषद शाळेतील महिला मदतनीस आणि शिक्षिकेची छेड काढल्या प्रकरणी नागरिकांनी शाळेत जाऊन मुख्याधापकाची धुलाई केली आहे. कोल्हापुरातील कोरोची येथील जिल्हा परिषद शाळेतील ही घटना आहे. छेडछाड केल्याची माहिती सदरील शिक्षिका आणि मदतनीस यांना गावकऱ्यांना सांगितली. त्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी थेट मुख्याध्यापकावर हात उचलला.
महिला मदतनीस आणि शिक्षिकेची छेड काढल्याप्रकरणी नागरिकांनी मुख्याध्यापकाला जाब विचारला. त्यानंतर नागरिकांनी मुख्याधापकाची धुलाई केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मुख्याधापकाला चोप दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर नेटकऱ्यांकडून मुख्याधापकावर कारवाईची मागणी केली जात आहे.