शैक्षणिकअपडेटनोकरी/उद्योगमहाराष्ट्र

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांसाठी भरती…

Share this post

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने गट ब, गट क आणि गट ड च्या 14 संवर्गातील एकूण 2109 पदांसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार आपले अर्ज दिनांक 16 ऑक्टोबर 2023 ते 06 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात.महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023 अंतर्गत 14 संवर्गातील एकूण 2109 पदांसाठी सरळसेवा भरती होणार आहे.

पदाचे नाव :

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.शासनाने मान्यता दिलेली तीन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली सिव्हील अँन्ड रुरल इंजिनिअरिंग, सिव्हील इंजिनिअरिंग अँड रुरल रिकन्स्ट्रक्शन, ट्रान्स्पोर्टशन इंजिनिअरिंग, कंन्ट्रक्शन टेक्नोलॉजी, सिव्हील अँड एनवायरमेंटल इंजिनिअरिंग अशी अर्हता धारण केलेली असावी.अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

कनिष्ठ अभियंता (विद्युत) : दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.विद्युत अभियांत्रिकीमधील तीन वर्षाची पदविका धारण केलेली असेल किंवा शासनाने जाहिर केलेली त्याच्याशी समतुल्य असलेली इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम आणि इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक (पॉवर सिस्टम) अशी अर्हता धारण केलेली असावी.अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ : दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.विद्युत अभियांत्रिकीमधील तीन वर्षाची पदविका धारण केलेली असेल किंवा शासनाने जाहिर केलेली त्याच्याशी समतुल्य असलेली इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम आणि इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक (पॉवर सिस्टम) अशी अर्हता धारण केलेली असावी.अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक : दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.शासनाकडून किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेकडून घेण्यात येणारी किमान स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची एक वर्ष मुदतीची पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण, किंवा शासनाने वेळोवेळी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली आर्किटेक्चरल ड्रॉफ्टसमन (वास्तुशास्त्रीय आरेखक) पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर (बांधकाम पर्यवेक्षक) पाठ्यक्रम उत्तीर्ण अशी अर्हता धारण केलेली असावी.स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविकाधारक/पदवीधारक / पदव्युत्तर अशी उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेले उमेदवार पात्र ठरतात.अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

लघुलेखक उच्चश्रेणी : दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.उमेदवाराने लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट अशी अर्हता असल्याबाबतचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.उमेदवाराने इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

लघुलेखक निम्नश्रेणी : दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.उमेदवाराने लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट अशी अर्हता असल्याबाबतचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.उमेदवाराने इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

उद्यान पर्यवेक्षक : कृषी किंवा उद्यानविद्या यातील पदवी धारण केलेली असावी आणिनिवासी जागे भोवतीची उद्याने किंवा इतर कोणतीही सार्वजनिक किंवा खाजगी उद्याने किंवा रोपवाटीका (नर्सरी) यांची किंवा या तिन्हींची निगा राखण्याच्या व विकास कामाचा तसेच सार्वजनिक उद्यानात व रस्त्याच्या कडेने झाडे लावणे या कामाचा किंवा बागकामाशी संबंधित अन्य कोणताही किमान 2 वर्ष कालावधीचा प्रत्यक्ष अनुभव धारण केलेला असावा. या अनुभवाचे प्रमाणपत्र संबंधित मालक, जनरल मॅनेजर, विभाग प्रमुख किंवा नियुक्ती प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले असावे.अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

सहाय्यक कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ : दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्राची पदवी धारण केलेली असावी.अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

स्वच्छता निरीक्षक : दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.(महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कायदा 1965 (एमएएच एक्सएलआय ऑफ 1965) अंतर्गत विभागीय मंडळाने विहित केलेली माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा आणि शासनाने त्या परिक्षेची समकक्ष ठरविलेली दुसरी कोणतीही परीक्षा उत्तीर्ण असावा).संचालक, सार्वजनिक आरोग्य यांची मान्यताप्राप्त किंवा शासनाने तिच्याशी समकक्ष ठरविलेली स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्राची परीक्षा उत्तीर्ण असावा. III. जे उमेदवार स्वच्छता अभियांत्रिकी पदवीका धारण करीत आहेत, अशा उमेदवारांना पसंतीक्रम देण्याचा विचार करण्यात येईल.पोट कलम II आणि III मध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता धारण करणारे आणि वर्ग-4 च्या कर्मचाऱ्यांना कार्यमग्न ठेवून, स्वच्छतेची कामे करुन घेण्याचा अनुभव 5 वर्षापेक्षा कमी नाही असे उमेदवार.अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

स्वच्छक : शासनाने किंवा इतर समतुल्य व सक्षम प्राधिकान्याने मान्यता दिलेल्या इयत्ता सातवीमधून बढती दिलेली असावी.अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

शिपाई : दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: http://mahapwd.gov.in/


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *