अपडेटमहाराष्ट्रराजकारण

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कधी होणार ?

Share this post

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या 2 दिवसांत राज्यातील राजकीय पक्ष व विविध संस्थांशी चर्चा करुन विधानसभा निवडणुकांसाठीचा आढावा घेतला आहे.

आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठीची महत्वाची माहिती दिली. महाराष्ट्रातील निवडणुका कधी होणार ? राज्यात मतदारांची संख्या किती आहे? मतदानापूर्वी निवडणूक आयोगाची तयारी कशी असेल याबाबत निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

दोन दिवसांपासून राजकीय पक्षांशी चर्चा झाली. सण, उत्सव पाहून निवडणुका घोषित करा, असं राजकीय पक्षांचं म्हणणं पडलं आहे. आम्ही बसपा, आप, काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एसपी, शिवसेना उबाठा, भाजपा अशा ११ राजकीय पक्षांशी चर्चा केली. या पक्षांनी आम्हाला दिवाळीचा मुद्दा सांगितला. तो सण लक्षात घेऊन निवडणूक तारीख जाहीर करा अशी विनंती त्यांनी केली. निवडणुकीची तारीख ही सुट्ट्या लक्षात घेऊन ठरवा अशीही विनंती आम्हाला कऱण्यात आल्याची माहिती राजीव कुमार यांनी दिली. त्यामुळे साधारणतः सण-उत्सव टाळून निवडणूक लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्रात ९.५९ कोटी मतदार आहे. त्यातील पुरुष मतदारांची संख्या 4. 95 कोटी आणि स्त्री मतदारांची संख्या 4.64 कोटी आहेत, थर्ड जेंडर म्हणजेच तृतीयपंथी मतदारांची संख्या 5997 असून राज्यातील दिव्यांग मतदार 6.32 लाख एवढे आहेत. प्रथमच मतदान करणाऱ्या नवं मतदारांची संख्याही तब्बल 19.48 लाख इतकी आहेत. शहरातील मतदान बुथ केंद्रांची संख्या 42 हजार 585, तर ग्रामीण महाराष्ट्रात 57 हजार 601 मतदान बुथ केंद्र असणार आहेत. निवडणुका एका टप्प्यात होणार की दोन टप्प्यात होणार हे आम्ही लवकरच स्पष्ट करु, असे निवडणूक आयुक्तांनी यावेळी सांगितले.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *