अपडेटयोजना

महाराष्ट्रात झेरॉक्स आणि शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Share this post

महाराष्ट्रात झेरॉक्स आणि शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली आहे. जिल्हा परिषद अंतर्गत ही योजना राबविण्यात येत असून, दिव्यांग व मागासवर्गीय लाभार्थींना 100% अनुदानावर या योजनेचा लाभ मिळणार आहे.

यामध्ये 18 ते 60 वयोगटातील दिव्यांग व्यक्ती तसेच मागासवर्गीय लाभार्थींना 100% अनुदानावर झेरॉक्स व शिलाई मशीन दिली जात आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे गरजू व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांना व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून देणे आहे.

जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाद्वारे या योजनेचा लाभ दिव्यांग आणि मागासवर्गीय लाभार्थींना दिला जात आहे. यामुळे हे लाभार्थी झेरॉक्स किंवा शिलाई मशीन घेऊन आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता.

जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *