अपडेटमहाराष्ट्र

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नवनियुक्ती

Share this post

सी.पी.राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर दुसरकीडे माजी विधानसभा अक्ष्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाने ही माहिती दिली आहे. राधाकृष्णन हे रमेश बैस यांची जागा घेतील. बैस हे १८ फेब्रुवारी २०२३ पासून राज्यपाल होते. मध्यरात्रीनंतर १ वाजता राष्ट्रपती भवनाकडून यासंगदर्भातील पत्रक जारी करण्यात आलं आहे. या परित्रकामध्ये एकूण १० राज्यांमधील राज्यपालांच्या बदल्या तसेच फेरनियुक्त्या असल्याचं सांगण्यात येत आहे. सदर नियुक्त्या या पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होतील, असं सांगण्यात आलं आहे.

६७ वर्षीय सी.पी. राधाकृष्णन हे मूळ तामिळनाडूचे आहेत. त्यांचा जन्म ४ मे १९५७ रोजी तिरुपूरमधये झाला. वयाच्या १६व्या वर्षापासून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम सुरु केले.

कोइमतूर मतदारसंघातून लोकसभेवर राधाकृष्णन रे दोन वेळा निवडून गेले. भाजपचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. २००४ ते २००७ या कालावधीत त्यांच्याकडे तामिळनाडूची सूत्रे होती.

सी.पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती अशा वेळी झाली आहे जेव्हा राज्यात या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. राधाकृष्णन हे दीर्घकाळ भाजपचे सदस्य होते. तामिळनाडूच्या कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा खासदार म्हणून निवडून आले. ते तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *