मराठा आरक्षणाचे स्टेटस ठेवल्याने २६ शिक्षकांना नोटीसा,जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांची कारवाई…
मराठा आरक्षणाच्या मागणीचे स्टेटस सोशल मीडियावर ठेवल्याप्रकरणी जालन्यातील शिक्षकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. ओबीसी नेत्यांच्या तक्रारी वरून 26 मराठा शिक्षकांना वॉट्सअपला स्टेट्स ठेवल्या प्रकरणी नोटीस पाठवण्यात आली असून जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी ही नोटीस पाठवली आहे.
दनापूर तालुक्यातील नानेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाने मराठा आंदोलनादरम्यान मराठा समाजाविरुद्ध आक्षेपाहार्य पोस्ट केल्याची घटना घडली होती. त्यावर मराठा समाजाकडूनजिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे एकूण 30 तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्या नंतर ग्रामस्थ आणि शिक्षकांना एकत्र बोलवत मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दोन्ही बाजूच्या तक्रारी आयकत त्यावर सुनावणी ठेवली होती.
अशातच जिल्ह्यातील ओबीसी नेत्यांनी मराठा शिक्षक आरक्षण मागणीचे स्टेट्स स्वतःच्या सोशल मीडियाला ठेवत असल्याचा आक्षेप घेतला होता, त्यावर आज मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी २६ मराठा शिक्षकांना ७ फेब्रुवारीला सुनावणीला उपस्तित राहण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहे.
